अंजनिसुता पवनकुमारा ।
रामदूता तू भक्ताधारा ।
संकटनाशना भव दुःखहारी ।
तुजविण हनुमंता मज कोण तारी ॥ १ ॥
रामदूता तू भक्ताधारा ।
संकटनाशना भव दुःखहारी ।
तुजविण हनुमंता मज कोण तारी ॥ १ ॥
केसरीनंदना वीर प्रचंडा ।
रुद्रावतारा तेज अखंडा ।
भयभंजना विघ्नविदारी ।
तुजविण हनुमंता मज कोण तारी ॥ २ ॥
लंकादाहका सीतान्वेषी ।
रामकार्यीं सदा अभिलाषी ।
भक्तजनांचा तू दुःखहारी ।
तुजविण हनुमंता मज कोण तारी ॥ ३ ॥
गदा ध्वज करीं शोभतसे ।
सिंदूराङ्ग तव शोभुन दिसे ।
कपिवरा तू पापनिवारी ।
तुजविण हनुमंता मज कोण तारी ॥ ४ ॥
संजीवनी गिरि घेऊनि आला ।
लक्ष्मणप्राण पुनः जागविला ।
महावीरा अनंत कृपाकारी ।
तुजविण हनुमंता मज कोण तारी ॥ ५ ॥
अहिरावणाचा संहार केला ।
रामलक्ष्मण पाताळातुन आणला ।
अष्टसिद्धीचा तू अधिकारी ।
तुजविण हनुमंता मज कोण तारी ॥ ६ ॥
भूतपिशाच्च समीप न येती ।
महावीरनाम जपे जो निती ।
रक्षिसी त्यासी संकटवारी ।
तुजविण हनुमंता मज कोण तारी ॥ ७ ॥
रामनामाचा जप करिसी ।
रघुवीरचरणीं लीन अससी ।
चिरंजीवा कल्याणकारी ।
तुजविण हनुमंता मज कोण तारी ॥ ८ ॥
दासास तुझ्या ना भय ना चिंता ।
संकटहरणा तू करुणावंता ।
कष्टभंजना तू सुखकारी ।
तुजविण हनुमंता मज कोण तारी ॥ ९ ॥
सुग्रीवसखा विभीषणबंधू ।
रामभक्तीचा अखंड सिंधू ।
भक्तजनांचे तू संकटनिवारी ।
तुजविण हनुमंता मज कोण तारी ॥ १० ॥
'मेघ' म्हणे मी श्रीपादांचा दास ।
त्यांच्या आज्ञेने हनुमंत उपास ।
शरण तुला आलो हो माझा कैवारी ।
तुजविण हनुमंता मज कोण तारी ॥ ११ ॥
॥ जय जय श्रीराम जय श्री हनुमान॥
गुरुवार, ७/५/२६ , ४:०० PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:
Post a Comment