भक्त पालका करुणा करा,
कष्टभंजना श्रीपादा कृपा करा,
हृदयी माझ्या नित्य निवास करा,
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।
कष्टभंजना श्रीपादा कृपा करा,
हृदयी माझ्या नित्य निवास करा,
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।
सुप्रसन्न मुख मंडल सुंदर साजिरे,
तुम्हीच न स्वामी माझे सगे सोयरे,
गुढ स्मित भक्त तिमीर हरा,
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।
उंच गिरनारी तुम्हीच बसले,
कृष्णा तीरीही तुम्हीच वसले,
स्वामी निज रुप प्रकट करा,
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।
नयनी तुझीच दिव्य छबी रे,
श्वासागणिक नाम स्मरे रे,
अंतरातील अहंकार हरा,
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।
चरणी ठेवितो मस्तक माझे,
सदा अंतरी नाम तुझेच गाजे,
मज भवसागरातून पार करा,
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।
शुक्रवार, ८/५/२६ , १२:४० PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:
Post a Comment