उष:काल भगवा शांत,
कृष्णा वाही संथ दक्षिणी।
पल्याड उभ्या वाट पाहत,
चौसष्ट त्या योगिनी।।
हातात आरतीचे भरले ताट,
शतोत्तर अष्टाविंशती अक्ष।
ओवाळण्यास तुज पाहती वाट,
मध्यान्ही नृसिंह तटस्थ वाडीत।।
मृदु घुमला घंटानाद कानी,
हिनेच्या सुवासे भरला श्वास।
दर्शनाची ओढ अद्भुत मनी,
नृसिंहा तुझा अखंड ध्यास।।
कृष्णेच्या या तीरी उभे,
ते शांत सुंदर मंदस्मित रूप।
भक्तांस अनायास लाभे,
नृसिंहाचे अलौकिक स्वरूप।।
पायी ठेवितो मस्तक माझे,
कृष्णेच्या या पुण्यतीरी।
कृपादृष्टी तुझी वर्षे,
नृसिंहा राही तू सदा जवळी।।
— अजय सरदेसाई - मेघ
रविवार, २४ मे २०२६, दुपारी १२:४०

No comments:
Post a Comment