तुझ्या नामात आधीच अडकले मन,
ध्यास आता लागला तव दर्शनाचा।।
ध्यास आता लागला तव दर्शनाचा।।
ऐकीली श्रोत्री देवा इतकी तुझी ख्याती,
ध्यास माझ्या दृष्टीस तुला पहाण्याचा।।
मन माझे झाले चकोर, डोळे भावविभोर,
तृष्णा मिटूदे, वाहुदे झरा दर्शनामृताचा।।
सज्जनांची वाणी म्हणे तुज स्मर्तगामी,
मग का पाहसी रे अंत तू या भक्ताचा।।
'मेघ' विनवितसे आता, कळकळीने ताता,
आणिक नको उशीर, ये वेगे धावून आता।।
मन माझे बहु क्लांत,निजो दे मज निशंक शांत,
कुशीत तुझीया, माऊली ये बिगी बिगी आता।।
रविवार, २४/५/२०२६ , १०:११ AM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:
Post a Comment