Total Pageviews

Thursday, 7 May 2026

कष्टभंजन हनुमान आळवणी



करा हो कृपा, कष्टभंजन मारुती राया,
क्लेश-दुःखाने ग्रासियेली मन आणि काया।

श्रीपादांनी केला तुझ्याकडे निर्देश,
घडविले दर्शन, दिला तुला पूजण्याचा उपदेश।

कष्टी होऊन आलो मी तुला शरण,
रामाची आण तुला — सोडवी माझे ग्रहण।

कृपादृष्टी टाकुनी कर दुःखांचे हरण,
श्री  कष्टभंजन हनुमान— "मेघ" आला तुला शरण।

गुरुवार, ७/५/२६ , १२:३० PM 
अजय सरदेसाई -मेघ

No comments:

Post a Comment