Total Pageviews

Tuesday, 19 May 2026

स्वामी समर्थ प्रार्थना


स्मरता नाम स्वामी समर्थ, टळतात सारे अनर्थ ।
तुमच्या विना माझ्या जीवनात, दुजा न कोणी समर्थ ॥

स्वामी, ओढीविण तुमच्या हे जगणेच व्यर्थ ।
तुम्ही आहात जवळी माझ्या, म्हणुनी जीवनास अर्थ ॥

त्रितापांनी पिचलो होतो, मन होते आक्रांत ।
दर्शन होता तुमचे स्वामी, मिटली सगळी भ्रांत ॥

स्वार्थ सारा विरुनी जावा, उमजावा खरा परमार्थ ।
चरणी तुमच्या लाभावा स्वामी, जीवनाचा यथार्थ ॥

जीवनास माझ्या अर्थ द्यावा, देऊनी चारी पुरुषार्थ ।
कृपाछायेत तुमच्या स्वामी, व्हावे जीवन कृतार्थ ॥

'मेघ' म्हणे नामस्मरणे साधा हो आपुला हितार्थ ।
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

मंगळवार, १९/५/२६, ९:२६ PM
अजय सरदेसाई - मेघ


 

No comments:

Post a Comment