Total Pageviews

21,625

Monday, 2 October 2023

बसुन तु विश्रांती घे रे


ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे

त्या त्या ठिकाणी असो हे निज रुप तुझे

मी ठेविले मस्तक ज्या ज्या ठिकाणी

तेथे तुझेची सद्गुरू मृदू पाय दोन्ही.

                            (समर्थ रामदास स्वामी)…………

……….. आणि पुढे


झरा वात्सल्याचा तुझ्या सतत वाहुदे रे I
करुणा तुझी मजवर अशिच राहु दे रे I

दृष्टी जेथे जेथे रे दत्तराजा जाय ही माझी I
तिथे तुझीच ही सुंदर मुर्ती मी पाहु दे रे I

तु फिरतोस जगी कल्याण करीत सर्व जनांचे I
जरासा विसावा दत्ता सदा मम हृदयी तु घे रे I

मधुर दुग्ध गायीचे हे घे करण्यास श्रम परिहार I
पेटवली पहा ही नाम धुनी बसुन तु विश्रांती घे रे I

 

सोमवार , दिनांक /१०/२०२३ , १०:१०

अजय सरदेसाई (मेघ)

 

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

 🙏🔥🙏

No comments:

Post a Comment