Total Pageviews

Saturday, 11 May 2024

कैलास एक अनुभव



रात्र टळून ब्रम्ह मुहूर्त लागला होता.मी उठलो आणि कांबळ पसरून सुखासनात बसलो ,समोरच्या घडल्यात चार वाजले होते . सुखासनात बसलो असलो तरी पाठीचा कणा मात्र ताठ होता पण बाकी सर्व शरीर हलकं आणि शिथिल होतं. पूर्वी खूप जीवाचे रान करावं लागायचे हे जमावण्यास. नाव इट हॅज बीकम सेकंड नेचर ,फार कष्ट पडत नाहीत

मी डोळे मिटून घेतले. मन शांत केले. मन एका कृष्णाडोहा सारखे झाले. फक्त तरंग उठत होते पण काहीच दिसत नव्हते .थोडा वेळ तसाच गेला, आता कानावर घड्याळाची टिक टिक तेव्हडीच ऐकू येत होती हळू हळू ती ही  विरून गेली.मन पलटवार एक घडद निल-विवर अनुभवले, जाणिवेत आता फक्त मी आणि एक प्रसन्न एकांत होता . हो, एकांत आणि निरीव शांतता आणि एक अनोळखी हवी हवीशी वाटणारी उब. ही उब या एकांतातून आणि निरव शांततेतून येत आहे असे जाणवत होते .हळु हळु ते निल-विवर रूपेरी होत जाते .डोळे बंद आहेत तरी तो रूपेरी प्रकाश डोळे दिपून टाकत आहे.

डोळे उघडतात आणि समोर एक अत्यंत सूंदर निळ्याशार पाण्याने भरलेले विस्तिर्ण सरोवर दिसते. सभोवतालचा प्रदेश शुभ्र बर्फच्छादित नी समतोल आहे. समोर दृष्टीच्या टप्यात एकच,पण उत्तुंग आणि रमणीय बर्फच्छादित शिखर दिसते. अरे हे कुठे तरी पाहिल्यासारखे वाटते! अरे हे तर कैलास आहे! पण एक ही मनुष्य कुठेही दिसत नाही. संपूर्ण प्रदेशात मी एकटाच. पाहता पाहता ते शिखर सोनेरी व्हायला लागते.माझी दृष्टी समोरच्या दृश्यावरून हटतच नाही आहे. अचानक कानांवर एक कर्णमधुर संगीत यायला लागले, अगदी मंत्र मुग्ध करणारे, दूर आकाशांतून सात निळ्या रंगांचे गोलक खाली येत होते,ते अलगद सरोवरांत उतरले आणि क्षणभर पाण्यांत गुप्त झाले. काही क्षणांतच ते परत वर आले आणि पानाच्या पृष्ठ भागापासून पासून साधारण दोन फुटांवर तरंगत होते. त्या एकांतात ते कर्णमधुर संगीत मला काही सांगत आहे असे वाटले, ते मला पाण्यांत बोलवत होते, मला माझे शरीर दिसत नव्हते पण मी असण्याची जाणीव होत होती. पाण्यांत शिरण्याचा विचार मनांत येताच माझ्यातून एक राजहंस बाहेर पडला. तो मीच असल्याची जाणीव होत होती. मी पाण्यात शिरलो आणि पोहत पोहत त्या निळ्या गोलकां कडे गेलो ………….

अचानक मी भानावर आलो. मी माझ्या रूम मध्येच सुखासनात बसलो होतो. घड्याळ टिक टिक करत होते, घड्याळात साडेचार वाजले होते. पुढे काय झाले असेल याची चुटपुट लागून राहिली होती. असे असले तरी एक हुशारी आणि तरतरी आल्याचे जाणवत होते . उठून महाराजांच्या तसबिरीला नमस्कार केला .महाराजांच्या मुख कमळावर एक सुंदर मिश्किल स्मित हास्य उमटल्या सारखे वाटत होते.

 

अवधूत चिंतन श्री गुरुदाव दत्त .

 

शनिवार    ११/०५/२०२४ ०५:४५ PM

अजय सरदेसाई (मेघ)


No comments:

Post a Comment