My thoughts on Spirituality , Vedant and us & its different aspects related to us .
Total Pageviews
Tuesday, 4 March 2025
शिववर्णनम्
Sunday, 2 March 2025
नमो नमोजी शंकरा देवाधिदेव शंकरा
Saturday, 1 March 2025
तुज विण शंभो मज कोण तारी
कुल देव माझा सप्तकोटेश्वर निरंकारी
कृपेची सावली धरी मजवर निरंतरी
जगाचा नियंता वसे हृदयी माझ्या अंतरी
तुज विण शंभो मज कोण तारी
जलाभिषेक मी धरला संतत शिवाच्या माथ्यावरी
सुवासिक शुभ्रफुले वाहतो मी शिव लिगांवरी
अर्धोन्मलित नेत्र मनमोहक स्मित तुझ्या मुखावरी
तुज विण शंभो मज कोण तारी
स्मरण तुझे होता मन माझे घेई भरारी
रोमांच उभे राहिले शरीरात कंप भारी
सिंहासनी बैसला कर्पुरगौर शेजारी गौरी
तुज विण शंभो मज कोण तारी
आभा विलक्षण पसरली सभोवारी
शिवपुजनांत रमले पहा सर्व नर नारी
प्रसन्न होऊन पाहे भक्तांसी त्रिपुरारी
तुज विण शंभो मज कोण तारी
जवळ आली शुभ घटिका ती मनोहारी
शिवाच्या गळ्यात पुष्प माळा घाली गौरी
माता उमेस पहा माझा चंद्रमौळी वरी
तुज विण शंभो मज कोण तारी
दुमदुमला मृदंग नाद, सभेत वाजली तुतारी
शिवगण नाचती होऊन मग्न आनंद लहरी
स्वर्गातुन बरसल्या अक्षता कैलासावरी
तुज विण शंभो मज कोण तारी
बुडालो बुडालो रे आकंठ मी शिव भक्तीत
शिव माझ्यात विरला नि मी विरलो शिवांत
वृतांत काय वर्णु हा अजब भारी
तुज विण शंभो मज कोण तारी
बुधवार,२६/२/२५,१५:०७ hrs.