ओवाळीतो आरती श्री
सद्गुरू राया
शरण
आलो स्वामी ठेवितो मस्तक तुझिया पाया
स्मृतगामी
म्हणती तुजला सर्व दैन्य जन
आळविता
सामोरा ठाकसी दत्त म्हणुन
तीन
शिरे सहा हात असे तुझे रुप
संहारीशी
तुच जगात त्रिविध ताप
भक्ता
साठी तुझ हृदयी भरलासे ओलावा
संकटी
धावत येऊनी कर माझा धरावा
घडले
जरी प्रमाद अनेक रे जगजेठी
क्षमा
करुन मजला धरावे तू पोटी
वारंवार
'मेघ' तुझी करुणा भाकतो
वाचवी
तुच आता मजला साकडे घालतो
दिन
दयाळा ओवाळीतात तुला नयनांच्या ज्योती
मान्य
करी रे देवा ही निर्गुण आरती