हे शारदे, कंठास माझ्या स्वर दे
हे सुधे, स्वरांस तू माझ्या सुर दे
हे सुधे, स्वरांस तू माझ्या सुर दे
स्वर साधना वरप्रदे तुझीच साधना
या साधनेस माझ्या शुभ्रे तू बहर दे
श्वासात बळ असो अंबरा एवढे
गळ्यात माझ्या वाग्देवी तू वळ दे
हे शारदे, कंठास माझ्या स्वर दे
हे सुधे, स्वरांस तू माझ्या सुर दे
तालसूर लय अंगी माझ्या स्थिर दे
रागरागिणी गळ्यात माझ्या भर दे
शब्द सुरांचा संगम घडावा असा
भक्तीरसाने ओथंबून स्वर दे
शुक्रवार, १७/७/२०२६ , ११:३० AM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:
Post a Comment