Total Pageviews

Saturday, 2 September 2023

मज दर्शन दे रे दिगंबरा श्रीदत्ता


 

मज दर्शन दे रे दिगंबरा श्रीदत्ता

मज दर्शन दे रे दिगंबरा श्रीदत्ता

तिमीरांत कुठे मज सोडूनि गेला ताता

पाहुनी तुझी वाट नयन थकले आता

मज दर्शन दे रे दिगंबरा श्रीदत्ता

 

का तव चरणांची ओढ मला लाविली

का जन्म अगणिक आस मला दाविली

लपलास कुठे मम प्राण हरून आता

राहीन सुखे जरी तव श्वान होऊन आता

मज दर्शन दे रे दिगंबरा श्रीदत्ता

 

वेडावून चित्ता का भक्ती दिधली मजला

 जर तुम्हांस दर्शन नव्हते देणे मजला

स्मृतगामी म्हणोन बिरुद असे जगजेठी

तरी तुम्ही मजला काहो ना देता भेठी

तव विरहाने प्राण कंठाशी आले आता

मज दर्शन दे रे दिगंबरा श्रीदत्ता

 

न दिससी परी अस्तित्व तुझे जाणविसी

निज स्वरूप केव्हा मज दाखविसी

अंत समयी असूदे तुझीच मूर्ती हृदयी 

साठून राहूदे नयनांत हा मम कैवारी 

 पुरे झाला रे फेरा जन्म-मरणाचा आता

मज दर्शन दे रे दिगंबरा श्रीदत्ता

 

मज दर्शन दे रे दिगंबरा श्रीदत्ता

मज दर्शन दे रे दिगंबरा श्रीदत्ता

कुठे तिमीरांत मज सोडूनि गेला ताता

तुझी वाट पाहुनी नयन थकले आता

मज दर्शन दे रे दिगंबरा श्रीदत्ता

 

 

शनिवार , दिनांक २/९/२०२३ , १२:१५

अजय सरदेसाई ( मेघ )

No comments:

Post a Comment