मज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूतामज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूतामज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता प्रिय चरण तुमचे मला न दिसती इथेतुम्ही भक्तास टाकुनी दत्ता गेला कुठेविश्वात तुम्ही या दडून बैसला कुठेपरी तुम्हांस पुरते ओळखले मी आतामज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता किती व्याकुळतेने तुम्हांस मी शोधिलेहृदयांतील प्रेम हे तव स्वरूपी अर्पिलेबाह्यातून काढून अंतरांत मन वळविलेका उगाच असली सत्व परिक्षा घेतामज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता किती सुयोग सुंदर भेटीचा मज दिलासाक्षात समोर प्रिय दत्त उभा ठाकलाना वियोग पुन्हा तुझा घडावा मलासाष्टांग दंडवत मी दत्त चरणी वाहिलामन व्याकुळ झाले तव दर्शनासी परतामज भेटूनी जा हो दत्तसख्या अवधूतामज भेटूनी जा हो दत्तसख्या अवधूता
मज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता
मज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता
मज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता
प्रिय चरण तुमचे मला न दिसती इथे
तुम्ही भक्तास टाकुनी दत्ता गेला कुठे
विश्वात तुम्ही या दडून बैसला कुठे
परी तुम्हांस पुरते ओळखले मी आता
मज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता
किती व्याकुळतेने तुम्हांस मी शोधिले
हृदयांतील प्रेम हे तव स्वरूपी अर्पिले
बाह्यातून काढून अंतरांत मन वळविले
का उगाच असली सत्व परिक्षा घेता
मज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता
किती सुयोग सुंदर भेटीचा मज दिला
साक्षात समोर प्रिय दत्त उभा ठाकला
ना वियोग पुन्हा तुझा घडावा मला
साष्टांग दंडवत मी दत्त चरणी वाहिला
मन व्याकुळ झाले तव दर्शनासी परता
मज भेटूनी जा हो दत्तसख्या अवधूता
मज भेटूनी जा हो दत्तसख्या अवधूता
बुधवार , दिनांक : ३०/०८/२०२३ , ०६:००
अजय सरदेसाई ( मेघ )
No comments:
Post a Comment