Total Pageviews

Thursday, 3 August 2023

अष्ट श्लोकी गुरू चरित्र

सकळ जनांसी करण्या उपकारु I

अवतरला मेदिनी  तो दिनकरु I

तयाची ख्याती पसरली सर्वत्रु I

नृसिंह सरस्वती नामे करुन II II

 

चतुर्दशः भुवनांचा पालकु I

त्रैलोक्याचा एकची तु नायकु I

तुची ब्रम्हा विष्णू व्योमकेशु  I

श्रीगुरु  म्हणती तुज सकळ जन II II

 

भिमा-अमरजा  संगमासी I

गाणगापूर नामे ग्रामासी I

अश्या ह्या बहुपुण्य क्षेत्राशी I

त्रैमुर्ती स्वतः पातलेसी I

भक्त गणां तारावया II II

 

घडविल्या लिला अपरंपार I

येथे वर्षे चोवीस सारा सार I

सुखविले भक्त गण  फार I

किर्ती झाली दशोदिशी II II

 

केला मग विचार मानसी I

म्लेंच्छ येतील गावांत दर्शनासी  I

त्याने विटाळ होईल विप्रजनांसी I

यास्तव गुप्त व्हावे मठातुनी I

मागे पादुका निर्गुण भक्तां करणे ठेवुनी

नित्य पूजावयाII II

 

बहुधान्य नामे संवत्सरेसी I

जेव्हा बृहस्पती कन्या राशिसी I

आणिक सुर्य उत्तर गतीसी I

माघ मासी वद्य प्रतिपदेसी I

लौकिकार्थ्या  निजधामासी I

केले गमन II II

 

नंदी  नामा आणि नरहरी देव I

स्वतः सिद्ध मुनी सायंदेव I

चौघांसी निरोपिती प्रेमे गुरुदेव I

म्हणती राहा सदैव सुखे करोनी II II

  

आणिक  एक केले श्रीगुरूंनी I

शेवंती पुष्प दिधले प्रसाद म्हणुनी I

म्हणितले शिष्यांसी सदैव पूजा म्हणोनी I

सुखे नांदल आणिक पावाल चारही  पुरुषार्थ II II

 

हे अष्ट श्लोकी गुरुचरित्र असे पावन I

तुमहांस केले हो सांक्षेपे मी कथन I

मज कडून झाले हे कार्य गुरुकृपे करुनी I

तुम्ही द्यावी पोचप्रेमे याचा स्वीकार करुनी I

शेवटी असे ही प्रार्थना श्रीगुरु प्रती I

जे हे गुरुचरित्र अष्ट श्लोकी, वाचती वा श्रवणती I

त्यांची व्हावी इच्छापूर्ती तुज कृपेंकरुनिया त्वरिती II II

 

II श्रीगुरु चरणार्पणमस्तु शुभंभवतु II

 

 

 

 

गुरुवार दिनांक ३/८/२०२३ ,  ०२:४५  PM
 अजय सरदेसाई (मेघ)


No comments:

Post a Comment