दत्ता अवधूता भावपुष्पे अर्पितो तव चरणी ।
करी कोण तुजविण
नाव भक्ताची पार या भवार्णी ।।
कृपाघना राहो दृष्टीत सर्वदा दत्ता तुझेच श्री चरण ।
मम हृदयात चालो अविरत तुझेच नामस्मरण ।।
दिनदयाळा राहो तन मन बुद्धी सर्व तुझ्यात रममाण ।
न काळास ही सापडो ,कर विलिन तुझ्यात माझे प्राण ।।
🙏❤🌷🙏
गुरुवार,२४/८/२३, १२:३० PM
अजय सरदेसाई (मेघ )
No comments:
Post a Comment