प्रथमं केवलं "सत" आसीत I
अन्यत् किमपि नासीत् I
ततः कालः आरब्धः I
एवं असत् जातः I
मी पाहतो की अनेकांनी "सत" ची व्याख्या त्यांच्या उत्कृष्टतेनुसार करण्याचा प्रयत्न केला आहे. मग ते उपनिषदातील असो वा इतरत्र. बरेच लोक जवळ आले आहेत परंतु अद्याप कोणीही यशस्वी झालेले नाही आणि मला शंका आहे की कोणी कधी होईल.
हे π (Pi) चे अचूक मूल्य शोधण्यासारखे आहे. ते अशक्य आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे पण अनेकांनी हे करून पीएचडी मिळवली आहे. हे मुल्य शंबर दशांशाने अचूक मूल्यापर्यंत पूर्ण केले आहे पण अचुक मुल्य कधीच मिळणार नाही या A.I. च्या युगात ही नाही !
या संपूर्ण गोष्टीचे मूल्य काय आहे याचा अंदाज लावता येत नाही पण काहींनी पीएचडी मिळवली आहे हे मात्र झाले.
"सत" हे ज्ञानेंद्रियांच्या आणि ज्ञानाच्या पलीकडे आहे. कोणीही ते पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही, वास घेऊ शकत नाही, चव घेऊ शकत नाही किंवा स्पर्श करु शकत नाही.
म्हणुनच ते या शरीराच्या आणि बुद्धी च्या अनुभवातीत आहे.
म्हणून ज्या क्षणी एखाद्याच्या मनाच्या कल्पनेने व बुद्धी च्या तरकाने याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला जातो ते "असत" च असते.
जसे आता आहे 🙏
०८/०८/२०२३ , ०१:००
अजय सरदेसाई ( मेघ )
No comments:
Post a Comment