ये जवळी घे जवळी दत्त सखया भगवंता
ये जवळी घे जवळी दत्त सखया भगवंता
निज स्वरुप दावुनी का राहसी दूर आता
ये जवळी घे जवळी दत्त सखया भगवंता
रे सुंदर त्या कृष्णे तीरी असशी उभा तप करीत
रे सुंदर त्या कृष्णे तीरी असशी उभा तप करीत
न टाकीसी कटाक्ष एक तरी मजवरी आता
ये जवळी घे जवळी दत्त सखया भगवंता
निशिदिनी तुज स्मरूनी पाही वाट रे मी अजुनी
निशिदिनी तुज स्मरूनी पाही वाट रे मी अजुनी
तरी न दिसशी मज झालास का दुर्लभ तु नाथा
ये जवळी घे जवळी दत्त सखया भगवंता
शोधून तुज दिन रात्र थकले मम सर्व गात्र
शोधून तुज दिन रात्र थकले मम सर्व गात्र
दया तरी का न येई तुझ मजवरी रे ताता
ये जवळी घे जवळी दत्त सखया भगवंता
तुज वाचून नाही कुणी त्राता मज त्रिभुवनी
तुज वाचून नाही कुणी त्राता मज त्रिभुवनी
तुझ वीण भव सागर हा कसा पार करू आता
ये जवळी घे जवळी दत्त सखया भगवंता
ये जवळी घे जवळी दत्त सखया भगवंता
ये जवळी घे जवळी दत्त सखया भगवंता
निज स्वरुप दावुनी का राहसी दूर आता
ये जवळी घे जवळी दत्त सखया भगवंता
मंगळवार , दिनांक : २९/०८/२०२३ , ०१:३० PM
अजय सरदेसाई ( मेघ )
माणसाला ही पंख असतात ह्या चित्रपटातले वि . स . खांडेकर लिखित , मीनाताई मंगेशीकर यांचे संगीत (राग यमन कल्याण वर आधारित ) आणि लता दीदींनी आपल्या अलौकिक आवाजात स्वरबद्ध केलेल्या भक्ती गीतावरून मला स्फुरलेले वरील भक्ती गीत : ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता
मूळ गीताची लिंक :
https://geetmanjusha.com/lyrics/17806-ye-jawali-ghe-jawali-%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80Video :
https://www.youtube.com/watch?v=duoOFxiUf8A
No comments:
Post a Comment