श्रीपाद श्रीवल्लभा तुमची नित्य कृपा मजवरी असुदे।
तुमच्या मधुर दर्शनाचा योग नित्य मला मिळुदे ।
किती यथार्थ सुंदर केलीत तुम्ही शंकर भट्टाच्या आयुष्याची आखणी।
पुर्ण करा ना ताता श्रीपाद श्रीवल्लभा माझीही छोटीशी मागणी।
सानिध्य तुमचे आणि तुमची भक्ति जन्म जन्मांतरी मिळुदे ।
तुमच्या मायेच्या पंखा खाली आयुष्य माझे सर्वदा घडुदे।
याहो याहो सर्वेशा भक्त वत्सला भक्ता घरी पायधुळ द्याहो ।
आळवीतो तुम्हास मी आर्त स्वरांनी माझ्या हाकेस ओ द्या हो ।
बिरुद मिरवतां स्मृतगामी म्हणुनी बसलात कुठे मग लपुनी ।
आता यतिश्वरा पुरे परिक्षा धावुन त्वरित या भक्ताची हाक ऐकुनी ।
शुक्रवार , १५/०९/२०२३ , ०२:१५ PM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment