Total Pageviews

Saturday, 30 September 2023

नका पाहु परिक्षा श्रीपादा अनसुता


नका पाहु परिक्षा प्रिय श्रीपादा अनसुता। 
तुम्हा चरणी करितो मी प्रेमाने वंदना । 
साष्टांग नमस्करोनी भाकतो मी करुणा ।द्यावी वात्सल्य भिक्षा मज भवभय हरणा । 
किती जन्म न जाणे लागले इथवर पोचण्यास । 
तुझ्या मनोहर पदांचे मधुर दर्शन होण्यास ।
भेटीची तुमच्या तृष्णा लागली आता ।नका पाहु परिक्षा आणिक  ताता।
मज भेटीस या हो दत्त सख्या अवधूता । 


शनिवार दिनांक ३०/९/२०२३ , २२:१० PMअजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment