Total Pageviews

Sunday, 17 November 2024

दत्ता ची फेरी


दत्ता ची फेरी असे सर्व जगभरी,

फिरतसे तिंन्ही त्रिकाळी,

दिनांसी तारावया.

 

त्याची थोरवी वर्णावया,

असमर्थ माझी जिव्हा,

दयानिधी तो भक्तवत्सल.

 

त्या सारिखा न दुजा होय,

जणू भक्तांची असे प्रेमळ माय,

सर्व मनो कामना पुरवी कामधेनु सरसी  .

 

म्हणे 'मेघ', तो काशाय वस्त्रधारी,

अनंत जन्मांचा असे माझा कैवारी,

आणे पुनरपी मार्गावरी, चुकतांची मार्ग.

 

तो कृपाघन अनंत,नाही लीलेसी अंत,

शुश्क काष्टासी करी पर्णवंत,भगवंत,

पाहतांची शुश्क काष्ट अमृत दृष्टीसी.

 

अष्ट सिद्धी ज्यांचे द्वारी,राबताती निरंतरी,

असा हा अनघा लक्ष्मी चा भर्तरी,

केवी अविरत ,भक्तां साठी कष्टतसे.

 

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

 

🙏 🪔 🙏

 

शनिवार, १६/११/२४ , १०:१७ AM

अजय सरदेसाई (मेघ)


Tuesday, 12 November 2024

मेरी नैया पार कराएगा


 

निसदिन मैं तेरी राह निहारु,तु और कितना तडपाएगा।

ईस रैन को जन्मों बिते,कब सुबह होगी और तु आएगा ।।

पापांधकार से मै घिरा हुं,ना है मुझे कोई सुख चैन।

तुम बिन गुरुवर कौन जिवन मे आशा का दिप जलाएगा।।

आर्त स्वर से पुकारु तुझको,अब तो तु सुन ले मेरी गुहार।

तुम बिन कौन इस भवसागर में मेरी नैया पार कराएगा।।

 

सोमवार, ११/११/२०२४ , १६:०० PM

अजय सरदेसाई (मेघ)

मस्तक तुमच्या चरणांवर ठेविले

सर्व संकटात,तुम्हीच ना मज रक्षिले,

मुखात घास माझ्या,तुम्हीच भरविले.

दिसामाजी दिस तुम्हीच मज पोशिले,

देहास ह्या माझ्या,तुम्हीच ना सांभाळिले.

या जगाच्या अवडंबरांत तुम्हांस मी विसरलो,

तरी ही गुरुराया तुम्ही मज वार्‍यावर सोडिले.

संपूर्ण या विश्वात गुरुवरा,नाही दुजा तुम्हा जैसा

'मेघाने' कर जोडुनी,मस्तक तुमच्या चरणांवर ठेविले 


सोमवार , ११/११/२०२४  , १५:३५ PM

अजय सरदेसाई (मेघ)  


Sunday, 10 November 2024

रहस्योपनिषद


हिरंण्य गर्भं,गर्भस्य हेमबिजं, विभावसो:

तेन गर्भोत्भव सर्वं इदं दृष्यते ।।

कया सा?यस्या मध्ये हेमगर्भो वर्तते।

सा मातरं सर्वसृष्टेः समृद्धम्।।

 

एषा सत्यं!

 

सृष्टेः मातरं किम् रूपं दृश्यते?

कश्चिद् जानेत्?

दृष्टेर् दृष्टिं कः पश्यति?

कश्चिद् पश्यति।

 

एषा सत्यं। इति रहस्य।

 

हिरण्य गर्भ, गर्भ का सोने जैसा बीज है, जो प्रकाशमय है।

उससे यह समस्त दृश्य सृष्टि उत्पन्न होती है।।

कौन है वह,जिसमे यह हिरण्यगर्भ विद्यमान है।

वही सम्पूर्ण सृष्टि की माता है।।

 

यही सत्य है।

 

यह सृष्टि की माता कैसी दिखती है?

कौन जानता है?

दृष्टा की दृष्टि को किसने देखा है?

किसीने नहीं।

 

यही सत्य है ! यही रहस्य है।


रविवार , १०/११/२०२४  १६:५० PM

अजय सरदेसाई (मेघ)

Saturday, 9 November 2024

बांदिवडे महालक्ष्मी स्तुती


समुद्रसंभूतं विष्णूपत्नीच तू नारायणी

सर्वसुखसमृद्धी दात्री तू कृपाकरिणी 

महालक्ष्मी तू ,ती बांदिवडे निवासिनी

माते तू भक्तरक्षिणी तू शिवभगिनी

चतुर्भुज तू ,मस्तकी शिवलिंग धारिणी

खड्ग नी गदा मिरविसी करांत दक्षिणी

वामे खंजीर नी प्रसाद पात्र उभी घेऊनी

गोमंतकांत तुज परशुरामे प्रतिष्ठापिली

लोक कल्याणास्तव आई तू इथे राहिली

हे कुलदेवी,कुलस्वामिनी करावा माझा स्वीकार

साष्टांग दंडवत घालून "मेघ" करितो तुला नमस्कार

 

शनिवार , ०९/११/२०२४    , १८:४५ PM

अजय सरदेसाई (मेघ)

 

महाराज तुम्ही मम हृदयस्थ असावे


 

महाराज तुम्ही मम हृदयस्थ असावे,

नाम तुमचे सदा माझ्या मुखी असावे,

सदासर्वदा मनात मी तुम्हांस स्मरावे,

काया,वाचा नी मने,मी तुम्हास सेवावे,

हेची वरदान महाराज तुम्ही मज द्यावे.

तव चरणी महाराज मज स्थान मिळावे,

लिलामृत तुमचे नित्य अनुभवास मज यावे,

तुमचेच चरित्रामृत मी नित्य स्वमुखे गावे,

हेची योगामृत तुम्ही मज नित्य पाजावे,

ह्याच आनंदयोगे मी नित्य तृप्त असावे.

 

बुधवार, /११/२४ , ०२:५० PM

अजय सरदेसाई (मेघ)

Sunday, 3 November 2024

सरस्वती स्तवन

हे विशालाक्षे,पद्मीनी,हे शोडषे,चपले सौदामिनी

रिते करण्यास अंधकार माझे,तू प्रकाश घेऊन ये.

 

सहस्र दलांनी आकांक्षा पेटवती मन माझे,

बुद्धी च्या विवेकाने त्या वेदना शमवण्यास ये.

 

दुःख,दिरिद्र्य,विशमतेने शिणले ग मन माझे,

उभार देण्या मनास .तू नवचैतन्य पेरून ये.

 

चौदा विद्या नी चवसष्ठ कलांची तू स्वामींनी,

हे वाग्देवी प्रसन्न हो ,तू माझ्या जिव्हाग्री ये.

 

हे सरस्वती तेजाने तुझ्या,तेजाळले मंडळ माझे,

तेजोमय मंडळांत या तू स्तिर लक्ष्मीस घेऊन ये.

 

रविवार , ०३/११/२०२४ , ०७:५५ आम

अजय सरदेसाई (मेघ)


 

Monday, 28 October 2024

हरी संगे होता एकरुप


म्हणती ज्ञानोबा माऊली,

असेल पुण्य सामग्री जर कनवटी.

राम नाम तेव्हाची  येई मुखावाटी,

येरव्ही स्वप्ना माजी ही येई ते.

 

जन्मांतरी जमवावी सुकृत कर्मांची राशी,

जेणे घडेल सख्य त्या इश्वराशी.

प्रेमे नेऊन बैसविल त्या कारणे,

तो कृपावंत भक्त वल्लभ वैकुंठासी.

 

पुण्य जरी घडे या शरिरासी,

कर्म फळ मिळे त्या जिवासी.

पुण्य फळे जाय जिव वैकुंठासी,

त्या योगे उद्धरतील एकविस पितृराशी.

 

त्याचेनी होई कर्म निश्क्रृती,

जन्माची होई पुनरावृत्ती.

आनंदीआनंद पसरतो ब्रम्हांडी,

हरी संगे होता एकरुप.

 

सोमवार, २८/१०/२४ , १३:०५ PM

अजय सरदेसाई (मेघ)


तुची मला तार

""""""""""""""""""""

तुची मला तार.

""""""""""""""""""""

जाणसी सर्व,तरी का जवळ घेईना,

सर्व ठायी तूच, तरी मज का दिसेना.

शिकविल कोण मज श्रद्धा भक्ती,

येई मज प्रयत्ने ही ती युक्ती.

कधीचा मी तिष्ठतो तव द्वारी,

आता तरी तु मज अंगिकारी.

म्हणे रवी तो तळपतो तुझ्याच तेजाने,

जगत सारे गतिमान तुझ्याच चैतन्याने.

सुक्ष्मातुन अनंता पर्यंत तुझाच विस्तार,

अनादी नाद तु, तुच तो ओंकार,

जळी,स्थळी,काष्ठी पाषाणी तुझा आविष्कार,

हे शिव सुंदरा ,अग्रजा तुची मला तार.

 

रविवार, २०/१०/२४ , :३० PM.

अजय सरदेसाई (मेघ)