सर्व संकटात,तुम्हीच ना मज रक्षिले,
मुखात घास माझ्या,तुम्हीच भरविले.
दिसामाजी दिस तुम्हीच मज पोशिले,
देहास ह्या माझ्या,तुम्हीच ना सांभाळिले.
या जगाच्या अवडंबरांत तुम्हांस मी विसरलो,
तरी ही गुरुराया तुम्ही मज वार्यावर न सोडिले.
संपूर्ण या विश्वात गुरुवरा,नाही दुजा तुम्हा जैसा
'मेघाने' कर जोडुनी,मस्तक तुमच्या चरणांवर ठेविले
सोमवार , ११/११/२०२४ , १५:३५ PM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment