त्या गिरनारीच्या गिरी शिखरी,
अविरत उभा तो माझा सद्गुरू कैवारी।।
चला वर जाऊया चरण पादुका दर्शनासी,
दशसहस्त्र पायऱ्या चढूनिया शिखरासी ।।
चला हो त्या गिरनारी गिरी शिखरी,
चला घेऊ या विसावा गुरुचरणी ।।
माता अंबेच्या कुशित ,गोरख धुनी समिप,
अमृतानुभव मिळावा ,पेटावा आनंदा चा नंदादीप।।
चला मग थोडे आपण खाली जाऊनी
कमंडलू तिर्थास जाऊन पाहु दत्त धुनी।।
चला आता जढुया आणखिन वर,
आलो पहा चढुन दशसहस्त्र पाऊलांवर।।
दृष्टी जडली दत्त चरण पादुकांवर,
शिखरावरी पहा प्रसन्न उभे दत्त दिगंबर ।।
पायऱ्या चढून तुम्हा दत्त भेट घडो,
दत्त चरणांशी नित्य प्रेम जडो ॥
चढताना ठेवा विश्वासाचा हा मंत्र,
पवित्र दत्त नाम हे मोक्षाचे तंत्र॥
गिरनार पर्वत हा सत्याचा कळस,
दत्तगुरुंचे माहात्म्य अमौलिक रस।।
जय गिरनार
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment