समुद्रसंभूतं विष्णूपत्नीच तू नारायणी
सर्वसुखसमृद्धी दात्री तू कृपाकरिणी
महालक्ष्मी तू ,ती बांदिवडे निवासिनी
माते तू भक्तरक्षिणी तू शिवभगिनी
चतुर्भुज तू ,मस्तकी शिवलिंग धारिणी
खड्ग नी गदा मिरविसी करांत दक्षिणी
वामे खंजीर नी प्रसाद पात्र उभी घेऊनी
गोमंतकांत तुज परशुरामे प्रतिष्ठापिली
लोक कल्याणास्तव आई तू इथे राहिली
हे कुलदेवी,कुलस्वामिनी करावा माझा स्वीकार
साष्टांग दंडवत घालून "मेघ" करितो तुला नमस्कार
शनिवार , ०९/११/२०२४ , १८:४५ PM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment