Total Pageviews

Sunday, 17 November 2024

दत्ता ची फेरी


दत्ता ची फेरी असे सर्व जगभरी,

फिरतसे तिंन्ही त्रिकाळी,

दिनांसी तारावया.

 

त्याची थोरवी वर्णावया,

असमर्थ माझी जिव्हा,

दयानिधी तो भक्तवत्सल.

 

त्या सारिखा न दुजा होय,

जणू भक्तांची असे प्रेमळ माय,

सर्व मनो कामना पुरवी कामधेनु सरसी  .

 

म्हणे 'मेघ', तो काशाय वस्त्रधारी,

अनंत जन्मांचा असे माझा कैवारी,

आणे पुनरपी मार्गावरी, चुकतांची मार्ग.

 

तो कृपाघन अनंत,नाही लीलेसी अंत,

शुश्क काष्टासी करी पर्णवंत,भगवंत,

पाहतांची शुश्क काष्ट अमृत दृष्टीसी.

 

अष्ट सिद्धी ज्यांचे द्वारी,राबताती निरंतरी,

असा हा अनघा लक्ष्मी चा भर्तरी,

केवी अविरत ,भक्तां साठी कष्टतसे.

 

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

 

🙏 🪔 🙏

 

शनिवार, १६/११/२४ , १०:१७ AM

अजय सरदेसाई (मेघ)


No comments:

Post a Comment