सद्गुरू आता करावा माझा
सांभाळ,
आली
आयुष्याची जवळ संध्याकाळ.
तुच
ब्रम्हा तुच विष्णु तुची जाश्वनिळ,
भजता
तुवा जेवी भजले देव सकळ.
गुरुराया
श्वासांत माझ्या तुझाच परिमळ,
काळही
मिंदा तुझा,त्यावरी तुझाच अंमळ.
स्मरताच
तुला, तु दत्त म्हणून उभा राहशी,
येरव्ही
न भेटशी जरी खर्चल्या अनंत जिवन राशी.
सगुण
निर्गुण यांचा समतोल राखुन तु आहे,
जो
जे वांछिल त्याच स्वरुपात तुजला पाहे.
तु
पिंडी ते ब्रम्हांडी सर्वत्र पसरला आहे,
चैतन्य
तुझेच ब्रह्मांडांत परिमळले पाहे.
आनंदघना
आता अमृतदृष्टी नी मज पाहे,
दास
"मेघ" प्रार्थना ही तव चरणी करितो आहे.
गुरुवार,२१/११/२०२४
, १०:०५ AM.
अजय
सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment