Total Pageviews

Monday, 30 December 2024

पंचप्राण हे झाले आतुर


पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी

सगुण रुपाने येऊन द्यावे दर्शन या भक्ता साठी 

 

पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी

किती जन्म मी तिष्ठलो स्वामी तुमच्या भेटीसाठी

 

पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी

फिरलो अगणिक कृष्णा तिरावर तुम्हास शोधण्यासाठी

 

पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी

तव दर्शनास आसुसल्या माझ्या नयनांच्या ज्योती

 

पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी

किती कोटी नाम जप केले तुम्हास भेटण्यासाठी

 

पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी

धाऊन या हो लवकर या भक्ताच्या प्रेमापोटी

 

पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी

तुम्हीच ना माय माझी गुरुवर जरी जन्मलो मी पोटी

 

पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी

आईबाप टाकुन गेले ना मज स्वामी तुमच्या ओटी

 

पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी

स्मर्तगामी या ब्रिदास जागुनी दर्शन द्यावे लौकिकार्थी

 

पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी

या हो लवकर स्वामी लेकिस ह्या माहेरी नेण्यासाठी

 

 

सोमवार, ३०/१२/२०२४ , २०:०६ hrs.

अजय सरदेसाई (मेघ)


Sunday, 15 December 2024

कुणी दत्त माझा पाहीला



कृष्णा
तिरी जटाधारी तो राहिला
सांगा कुणी दत्त माझा पाहीला
अवदुंबर तो पसरला सभोवार
छायेसी बैसला पहा एक यतीवर
अत्री घरी त्रिमूर्ती ने घेतला दत्त अवतार
जगत कल्याणा फिरतसे पृथ्वी वारंवार
अनसुया नंदन म्हणुन पावला ख्याती
पायी खडावा,खाकेसी झोळी,कमरेला छाटी
पिठापुरी तो श्रीपाद जन्माला 
येऊन कुरवपुरी प्रसिद्ध झाला
कारंजास नृसिंह म्हणून जन्मला
वनी करदळी जाऊन गुप्त झाला
प्रकटले दत्त होऊन समर्थ अक्कलकोटी 
लिला केल्या असंख्य, हातात घेऊन गोटी
भक्तांचा भार निसदीनी त्यांनी वाहीला
 सांगा कुणी दत्त माझा पाहीला

रविवार, १५/१२/२०२४ , ०८:१२ PM
अजय सरदेसाई (मेघ)

माझे गुरुवर


गिरनारी त्या उत्तुंग चरम शिखरावर

"चरण" पादुका ज्यांच्या तेच माझे गुरुवर.

 

चौसष्ट योगिनी राहती जेथे वाडीस कृष्णा तीरावर,

तेथे पादुका "मनोहर" ज्यांच्या तेच माझे गुरुवर .

 

कृष्णेच्या पश्चिम तिरी अवदुंबरी जेथे सानिध्य भुवनेश्वरी,

गुणीजन हो तेथे पादुका "विमल" ज्यांच्या तेच माझे गुरुवर.

 

भिमा अमरजा संगमी,अश्वत्थ तळी जे निरंतर अनुष्ठानी,

त्या गंधर्वपुरी पादुका "निर्गुण" ज्यांच्या तेच माझे गुरुवर.

 

 

रविवार , १५/१२/२०२४  , १७:३० हर्स,

अजय सरदेसाई (मेघ)

Thursday, 12 December 2024

फ़िक्र-ए-फ़र्दा


फ़िक्र--फ़र्दा बन्दे तू कर,

तू बस उसकी इबादत कर।

एक बार बस दिल से पुकार के देख उसे,

वक्त क्या है,मुक्कदर भी बदल जाएगा।  

हर मुराद,हर दुआ तेरी होगी कुबूल,

चाहा जो तुमने उससे भी ज्यादा मिल जाएगा।

जमीं पर तू भटकता रहा उम्र भर,

तरसता रहा तू खुशी को उम्र भर। 

खुशी तो ना मिली, मिला गम हर बदर

इस लिये कह रहा हुं मै कबसे हर बशर।

उसको दिल में जगा,उसका दीदार कर,

हाथ दुआ में उठे, फिर काहे का डर।

वो अंधेरों को रौशनी के उजालों में दे बदल,

तू देखता जा,जरा ठहर,जरा तू सबर कर।

फ़िक्र--फ़र्दा बन्दे तू कर,

तू बस उसकी इबादत कर।

एक बार बस दिल से पुकार के देख उसे,

वक्त क्या है,मुक्कदर बदल जाएगा।

हर मुराद,हर दुआ तेरी होगी कुबूल,

चाहा जो तुमने उससे भी ज्यादा तू पाएगा।

 

बुधवार ११/१२/२४ १२:३७ AM

अजय सरदेसाई (मेघ)

 

फ़िक्र--फ़र्दा = कल की चिंता

इबादत = पूजा

मुक्कदर = नसीब

बसर = शहर , ठिकाना

बशर = व्यक्ति , इंसान

दीदार = दर्शन , साक्षात्कार

दुआ  = प्रार्थना

 

Sunday, 8 December 2024

बोलावितो पंढरीनाथ


बोलावितो पंढरीनाथ  मज भेटिला पंढरीला,

मन गहीवरुन आले माझे, आनंदाचा पारिजात फुलला.

 

पंढरीस मी जाईन,विठ्ठलाचे चरण पाहिन,

अभंग गाऊनी चोख्याचे चंद्रभागेत न्हाहीन.

 

नामदेवापाशी जाईन,गुज गोष्टी करीन,

बैसून जवळ तयापासी पुसिन त्यासी भक्ती चे गहन.

 

जाईन त्या खांबापाशी जोका तो चोखामेळा,

डोळा भरुन पाहीन त्या खांबा आणि भेटीन गळा.

 

त्या कान्होपात्रा माईस जरा विचारीन वाइस,

उलघडावुन सांग सखे,माऊली हृदयी चे रहस्य,

 

शेवटी भेटेन माझ्या रखमाईस,घालिन लोटांगण,

पुसेन तिस ,कशी गो राहतेस तु दुर त्या विठ्ठला विण.

 

'मेघास' बोलाविले हरी,चल ये रे पंढरी,

मनांत झाल्या गुदगुल्या उठल्या आनंद लहरी.

 

रविवार, ०८/१२/२०२४ , १०:०० आम

अजय सरदेसाई (मेघ)