Total Pageviews

Friday 15 September 2023

नित्य तुमची कृपा असुदे


श्रीपाद श्रीवल्लभा तुमची नित्य कृपा मजवरी असुदे।

तुमच्या मधुर दर्शनाचा योग नित्य मला मिळुदे ।

किती यथार्थ सुंदर केलीत तुम्ही शंकर भट्टाच्या आयुष्याची आखणी।

पुर्ण करा ना ताता श्रीपाद श्रीवल्लभा  माझीही छोटीशी मागणी।

सानिध्य तुमचे आणि तुमची भक्ति जन्म जन्मांतरी मिळुदे ।

तुमच्या मायेच्या पंखा खाली आयुष्य माझे सर्वदा घडुदे।

याहो याहो सर्वेशा भक्त वत्सला भक्ता घरी पायधुळ द्याहो ।

आळवीतो तुम्हास मी आर्त स्वरांनी माझ्या हाकेस ओ द्या हो ।

बिरुद मिरवतां स्मृतगामी म्हणुनी बसलात कुठे मग लपुनी ।

आता यतिश्वरा पुरे परिक्षा धावुन त्वरित या भक्ताची हाक ऐकुनी ।


शुक्रवार , १५/०९/२०२३ , ०२:१५ PM

अजय सरदेसाई (मेघ)


No comments:

Post a Comment