परमात्मा परात्परू
पाविजे
मज लौकरू
मी विश्वाचे लेकरू
प्रार्थी तुझे ठायी
तव चित्त चिदंबरू
काया ती अगोचरू
ते चक्षू सोम-सुर्यु
तुज देखिजे केवी
मज नको अष्ट सिद्धी
मज नको नव निधी
सदा जवळिक तुझी
देई कृपाळा
सहस्रसाराचा परिमळु
परमानंद आळुमाळु
मिळो दे रे कृपाळू
नित्य मज
तूची सदा सर्वकाळ
करशी माझा संभाळ
माझे तुची आभाळ
न करी आबाळ
बालकाची
आता सरते शेवटी
तव एकची विनंती
मुक्ती द्यावी गोमटी
सायुज ती
चिदंबर = आकाश
अगोचर = पार्थिव नेत्रांस न दिसणारे
चक्षु = डोळे
सोम-सुर्यु = चंद्र-सूर्य
देखिजे केवी = कसे पाहावे
सहस्रार = सहस्त्र दल कमल
परिमळु = सुगंध
शुक्रवार , २९/०३/२०२४
०६:२५ PM
अजय सरदेसाई (मेघ )
No comments:
Post a Comment