सुखावलो तव दर्शने देवा आता न मज काही खंत ।
आणि काय मागु देवा मागण्यास ना काही अंत।।
तु असतांना काय उणे देवा समाधानी माझे चित्त।
जोवर तुझा हात मस्तकी माझ्या मी राहतो निवांत।।
नाम तुझे घेता दिसे तुझे रुप ते अनंत।
"मेघ " म्हणे तव दर्शने मी झालो बहु श्रीमंत ।।
येणे जाणे नुरले आता झालो मी तटस्थ ।
ज्ञानेंद्रिय सर्व उलटी होऊन पडली आत निचेष्ठ ।।
बुधवार,०६/०३/२०२४ , १०:१५ PM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment