महाराज आम्हा तुम्हाविण रहाणे नेणे।
तरी राहो आम्ही तव नाम:स्मरणे।
सारतो दिनरात।।
तुम्ही द्या हो लक्ष आम्हा भक्तांवर।
जेवी नजर ठेवी कासवी पिलांवर।
राहु निश्चिंत तव दृष्टीत, जरी असो दुर।
आनंद निमग्ने ।।
कृपादृष्टी पहावे आम्हांस तुम्ही।
प्रतिपाळावे स्वामी जन्मो जन्मी।
करावी ही इच्छा पूर्ण तुम्ही।
भक्त हट्टा लागुनी।।
आम्ही तुमचे दास मनी हेची आस।
सेवा घडावी तुमची जन्मोजन्मी।
तुमचा सहवास नित्य आम्हा।
आम्ही पूजावे सदा तुम्हा।
मनी ही इच्छा एकाची।।
आमचे तुम्हीच श्रीगुरु कल्पद्रुमु।
तूची भक्तांची माय कामधेनु।
घेतला भक्तांकारणे हा अवतारु।
अनुभवाने बोलत असे।।
स्वामी राखावे स्व:ब्रिदांस ।
रक्षून भवार्णी या दासास ।
'मेघ' म्हणे गुरुराया ।
द्यावा ठाव तुझिया पाया।
आकंठ ज्ञानामृते भिजवावा ।
कृपासिंधु ।।
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🙏🔥🙏
आज रविवार २५/२/२०२४ , माघ वद्य प्रतिपदा , शोभकृत नाम सवंत्सर , सायंकाळी ६:५५ PM
श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज निजानंदधाम प्रयाण दिवस ,
No comments:
Post a Comment