Total Pageviews

21,665

Thursday, 22 February 2024

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा


 

सद्गुरू हे सुंदर रुप तुझे मनभावन

प्रेमे न्याहाळिती मम तव सुलोचन

श्री दत्ता तुच सर्वस्वी सर्वकार्य कारण 

भक्तांसी तूची प्रतिपाळीसी प्रेमा लागून 

चित्त जडो हे माझे तझ्या श्री चरणी

हा जीव कायामनोवाचे लागो तुझे कारणी  

सद्गुरू तुजवीण तारील कोण मज या भवार्णी

मजवर अखंड कृपा दृष्टी तुझी असावी दातारा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

 

गुरुवार , २२/२/२०२४ , १:४६ PM

अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment