Total Pageviews

21,629

Sunday, 18 February 2024

अलवार सुगंध हिनेचा



अलवार सुगंध हिनेचा
दरवळला घरात माझ्या
मनात खुण पटली
आगमन तुझेच आहे।।१।।
 
बंद होतां पापण्या
तुलाच पाहतो मी
पुर्ण चंद्र आसमंती
स्वरुप तुझेच आहे  ।।२।।
 
श्वासात तुच माझ्या
तुच स्पंदनात आहे
तुच नादब्रह्म माझा
ओंकार तुच आहे।।३।।
 
कृष्णे ने पादुकांचा
मंगल अभिषेक केला
मृदु स्पर्शाने चरणांच्या 
प्रवाह शांत झाला ।।४।।
 
वाडी कृष्णा किनारी
मज खुणवित आहे
मनोहर चरण युग्म
मी ओवाळितो आहे ।।५।।


 माथा चरण युग्मां वर
मुखी दत्तात्रय नाम
शैवटल्या क्षणी त्या
गवसो कैवल्य धाम ।।६।।

 

IIअवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त II

 

रविवार १८//२०२४ , ०३:४० PM

अजय सरदेसाई (मेघ)


 

No comments:

Post a Comment