Total Pageviews

Monday, 4 October 2021

सदगुरौ आता तुच मज तारु

 


 मज अंगी न भक्ति गुण ।

न इंद्रिय दमन ते महा कठिण  ।

मज मन बुद्धि चे वारु हिन ।

फिरे सैरभैर दिशाहिन ।

उत्तम जन्म मज तु दिधला ।

री न साधे जे श्रेयस मजला ।

आता उरला एकची करु प्रकारु ।

ठेवितो मस्तक तव चरणी ।

सदगुरौ आता तुच मज तारु ।

-मेघ-

०४/१०/२०२१ , १२:३२ PM 

No comments:

Post a Comment