परी सदगुरू शोधण्यास काय उपाय?
सदगुरू कोणता करावा,तो कसा असावा,
ज्यात नाही षडरिपू, गुरु तसा असावा.
शिष्य वृत्ती कोणती, शिष्य कसा असावा?
जयाची गुरुचरणीच वृत्ती, शिष्य तसा असावा.
गुरु तोची जो शिष्याचे काही घेत नाही,
शिष्य ऐसा जो सर्व गुरुसच समर्पुन राही.
ह्यात द्वंद्व दिसले,परी ते फक्त बाह्य आहे,
चक्षूंस दिसले दोन तरी हृदय एकच आहे.
बुधवार , २६/८/२६ , ९:०० PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:
Post a Comment