Total Pageviews

Sunday, 23 June 2024

स्वामिया


 

मजसी सर्व प्रसंगातून नित्य तू सांभाळिसी सी रे स्वामीया

स्मरता तुज,तात्काळ तू धावून येसी रे स्वामीया

भक्तांसी पावसी सदासर्वकाळ तूची रे स्वामीया। 

तूची ना तो, जो अवदुंबरी रहासी रे स्वामीया।

भेटीतो भक्तांसी तूच ना सदैव कृष्णा तीरी स्वामीया।

तुज वीण आणिक कोण मज तारणहार आहे रे स्वामिया।

तूची माझा बाप नी तूची माझी माय स्वामिया।

बाह्यात शोधूनी सुख, किती तिष्टलो रे स्वामिया।

त्रितापे गांजलो मी, आता थकलो रे स्वामिया।

काही काळ गुंतलो मायेत ,तुज विसरलो रे स्वामिया।

श्रमूनी, दामुनी ,आलो पुन्हा तव कुशीत रे स्वामिया।  

कुर्वाळुनी आता मज निजवी तव मांडीवरी रे स्वामीया।

निर्भय,निशंक झोपेन मी ,मिळेल शास्वत सुख मज स्वामिया।

 

।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।

।।दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा।।

 

रविवार , २३//२४ ,०४:३०  PM

अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment