Total Pageviews

Thursday, 13 June 2024

तूझ्या वाचून नाही मज कुणी श्रीदत्ता


तूझ्या वाचून नाही मज कुणी श्रीदत्ता

सांभाळी आता तूच मज दिना,समर्था

पाही कृपादृष्टी ने रे दयाघना अनंता

दे चरणी जरासा स्थान तुझ्या मज नाथा

मज दिसूदे यत्र तत्र सर्वत्र तूझेच रुप निरंतर

असो नाम जप तुझाच अंतरी पडो श्वासांतर

तूझे श्रीपाद पडो सदैव मम सदनी

वसो मुद्रण कोमल तयांचे मम मनी

तव हृदयी मी अन मम हृदयी तूच असुदे 

आपल्यात श्री दत्त कधी द्वैत असुदे

ऐक हो दत्ता मज साकडे हे एक

तव चरण मिळो,जरी जन्म अनेक

 

गुरुवार  , १३/०६/२०२४   ०५:५०

अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment