Total Pageviews

Friday 28 June 2024

किती पहाल माझा अंत हो नाथा


 

किती पहाल माझा अंत हो नाथा

मन माझे विच्छिन्न झाले हो आता

गाठावे कधी मी ते दक्षिण द्वार

करावा कधी मोकळा मनाचा भार

किती सहावा बा मी नशिबाचा मार

दत्ता तुज आहे सर्व ठाऊक ताता

मी स्मरतो तुज ,ये तूच धाऊन आता

लोक उगाच का स्मर्तगामी तुज म्हणती

झाली सांज,वाट पाहती माझ्या नयन ज्योती

नको वेळ करु आता ,ये लौकर माझ्या नाथा

श्री दत्ता आले माझे प्राण कंठाशी आता

नको घेऊस आणिक तु परिक्षा

त्रितापातून तुच करी माझी रक्षा

स्वामीया ये लौकर तूला माझी आण

तू न आल्यास करीन मी निर्वाण

का न ऐकशी तुला बोलावितो एक भक्त

का रे तरी उभा तू अवदुंबरी असा तटस्थ

त्रिविक्रमाने ताता तुला लाविले बोल

विश्व रुप दर्शने चुकविले तू त्याचे मोल

सांग ना यात लपिली कोणती युक्ती खोल

सांग समजावून ते सर्व मला सखोल

का तरी माझ्या नाथा अजुन तू अबोल

सांग राखू कसा मी माझ्या मनाचा समतोल

बोल लवकर झाला जिव कासावीस

लावू नकोस तू भेटण्या युगे अठ्ठावीस

 

सोमवार २४/६/२४ १०:०८ PM

अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment