Total Pageviews

Sunday, 30 June 2024

शिव दर्शन


 

हृदय गर्भात प्रतिष्ठीला शिव

आनंदे सुखावला माझा जिव

भक्ती ज्योत केली सजिव

पेटवुन अंतरी

 

दशदिशा श्रोत्रांतुनी 

घेतल्या आत आकंचुनी

उसळला नाद त्यातुनी

ओंकाराचा

 

घेतले मिटुनी दोळे

दृष्टी वळविली आंत

प्रकाश भरला ओतप्रत 

जणू हिरण्यगर्भ तो

 

रोमरंध्रांस केले शांत

स्पर्शची नूरली भ्रांत

पद्मासनी बैसलों निवांत

विसरोनिया सर्व सृष्टी

 

मूळाधारातून ती शक्ती

येई जेवी लाट उसळून

तेवी एक एक चक्र उलंघोनी

वर शिव मिलनास येतसे

 

सहस्रसारांत झाले मिलन

याचे शब्दातीत असे वर्णन

सहस्त्रकोटी दामिनी जणू

कडाडल्या एकाच क्षणी

 

प्रखर त्या प्रकाशस्रोतांत

दिसला मज तो जो कर्पूरगौर

आदित्य तेज ज्या मुखी सौर

अखंड पसरलेले

 

रविवार  , ३०/०६/२०२४   ०५:३० PM

अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment