Total Pageviews

21,622

Sunday, 14 July 2024

होऊन निश्चिंत निजावे


अंतकाल येता स्वामी समोर तुम्हीच यावे ।
प्राण ज्योत मलवताना दृष्टीत तुम्हीच रहावे।।
उंबरठा आयुष्याचा ओलांडताना माझे बोट तुम्हीच धरावे।
पैलपार आल्यावर तुमच्या मंदिरी मज न्यावे।।
श्रमलो बहुत पृथ्वीवरती म्हणुन तुमच्या मांडीवरी मी निजावे।
निज माझ्या बाळा म्हणुनी तुम्ही अंगाई गीत गावे ।।
तुम्ही कुशीत घेताच मी आनंदकंद व्हावे ।
कुशीत आईच्या जसे लेकराने  होऊन निश्चिंत निजावे।।

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 

🙏🩷🙏


रविवार , १४/७/२०२४  ११:२५ PM

अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment