दत्ता तुम्ही परमपिता सद्गुरू
शरणागतास तुम्ही आधारु
दयाळा करुनी माझा स्विकारु
आता करा दासावर उपकारु
मज बाधो न कधी आपत्ती
दत्ता तुम्ही सदा वसावे चित्ती
मज कढुन कधी न घडो दुष्क्रुती
तव चरणी सदा असावी दृष्टी
हृदयी असो तव मुर्ती
तव नाम सदा मुखवरती
लोभो तव कृपेची श्रीमंती
वृत्तींची होऊ दे निवृत्ती
हा दास विनवुन तुम्हास प्रार्थी
न पुन्हा मिळो मज आवृत्ती
मनी भक्ती चा मोगरा रुजावा
तो आभाळी उंच चढावा
मोगऱ्यास त्या बहर यावा
परिमळ त्याचा पसरावा
आम्ही बसुन वाडीत कृष्णा तटी
दत्ता नित्य तुमचा दर्श मिळवावा
दत्ता द्या एकची हो हे वरदान
तुमची चाकरी हेची साध्य नी साधन
येणेची मिळे स्वामी मज समाधान
म्हणे "मेघ" मी झालो आनंदघन
दत्ता तुमची मुर्ती दैदिप्यमान
तव चरण माझे कैवल्य स्थान
बुधवार, २२/१/२५
११:०५ PM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment