Total Pageviews

Saturday, 25 January 2025

बांदिवडे निवासिनी श्री महालक्ष्मी अष्टकं


कमल नयने कमलासने सुर पुजिते,

बांदिवडे निवासिनी श्री महालक्ष्मी नमोस्तुते  ।१।

 

तुझ्या कृपेची सावली सतत लाभो आम्हा,

करितो विनवणी तुझ "मेघ" देई वर तो आम्हा ।२।

 

वास्तव्य तुझे असो आमच्या निवासा सदा ,

आपदा पळुनी जावी पाहुन तुज वर प्रदा  ।३।

 

सेवा नी पुजा घडो तुझी पिढ्या अनंत,

वर हा देऊनी माते कर आम्हास श्रीमंत  ।४।

 

तैसिच हो सुप्रसन्न जैसी झालीस सट्टो फट्टोस,

देई मज हे दान दयाळे, हा मेघाचा अट्टाहास   ।५।

 

सुख समृद्धि दायीनी,होई आम्हास वरप्रदा,

हे बांदिवडे निवासिनी तु आमची आराध्या   ।६।

 

आई आळवितो तुज मनाने गाऊनी हे स्तोत्र,

अजय शर्मा: नाम माझे असे नैदृव्य गोत्र  ।७।

 

आई,चूका आमुच्या घाल पोटी आणि करी गे आम्हास क्षमा,

बांदिवडे निवासिनी श्री महालक्ष्मी याचितो आम्ही तुझी क्षमा  ।८।

 

अष्टक हे रचवुन तुची घेतले मज कडुन,

आई तुझे तुजसी अर्पितो तुज नमुन  ।९।

 

।। श्री बांदिवडे निवासिनी महालक्ष्म्यार्पणमस्तु

 

शनिवार, २५//२५ ,

१२:१० PM

अजय सरदेसाई (मेघ)

 

No comments:

Post a Comment