Total Pageviews

Wednesday, 30 August 2023

मज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता


मज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता
मज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता
मज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता
 
प्रिय चरण तुमचे मला न दिसती इथे
तुम्ही भक्तास टाकुनी दत्ता गेला कुठे
विश्वात तुम्ही या दडून बैसला कुठे
परी तुम्हांस पुरते ओळखले मी आता
मज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता
 
किती व्याकुळतेने तुम्हांस मी शोधिले
हृदयांतील प्रेम हे तव स्वरूपी अर्पिले
बाह्यातून काढून अंतरांत मन वळविले
का उगाच असली सत्व परिक्षा घेता
मज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता
 
किती सुयोग सुंदर भेटीचा मज दिला
साक्षात समोर प्रिय दत्त उभा ठाकला
ना वियोग पुन्हा तुझा घडावा मला
साष्टांग दंडवत मी दत्त चरणी वाहिला
मन  व्याकुळ झाले तव दर्शनासी परता
मज भेटूनी जा हो दत्तसख्या अवधूता
मज भेटूनी जा हो दत्तसख्या अवधूता

बुधवार , दिनांक : ३०/०८/२०२३ , ०६:००

अजय सरदेसाई ( मेघ )

Tuesday, 29 August 2023

ये जवळी घे जवळी दत्ता सखया भगवंता



ये जवळी घे जवळी दत्त सखया भगवंता
ये जवळी घे जवळी दत्त सखया भगवंता
निज स्वरुप दावुनी का राहसी दूर आता
ये जवळी घे जवळी दत्त सखया भगवंता

रे सुंदर त्या कृष्णे तीरी असशी उभा तप करीत
रे सुंदर त्या कृष्णे तीरी असशी उभा तप करीत
न टाकीसी कटाक्ष एक तरी मजवरी आता
ये जवळी घे जवळी दत्त सखया भगवंता

निशिदिनी तुज स्मरूनी पाही वाट रे मी अजुनी
निशिदिनी तुज स्मरूनी पाही वाट रे मी अजुनी
तरी न दिसशी मज झालास का दुर्लभ तु नाथा
ये जवळी घे जवळी दत्त सखया भगवंता

शोधून तुज दिन रात्र थकले मम सर्व गात्र
शोधून तुज दिन रात्र थकले मम सर्व गात्र
दया तरी का न येई तुझ मजवरी रे ताता
ये जवळी घे जवळी दत्त सखया भगवंता

तुज वाचून नाही कुणी त्राता मज त्रिभुवनी
तुज वाचून नाही कुणी त्राता मज त्रिभुवनी
तुझ वीण भव सागर हा कसा पार करू आता
ये जवळी घे जवळी दत्त सखया भगवंता

ये जवळी घे जवळी दत्त सखया भगवंता
ये जवळी घे जवळी दत्त सखया भगवंता
निज स्वरुप दावुनी का राहसी दूर आता
ये जवळी घे जवळी दत्त सखया भगवंता

 

मंगळवार , दिनांक : २९/०८/२०२३ , ०१:३० PM

अजय सरदेसाई ( मेघ )


माणसाला ही पंख असतात  ह्या चित्रपटातले  वि . स . खांडेकर लिखित , मीनाताई मंगेशीकर यांचे संगीत (राग यमन कल्याण वर आधारित )  आणि लता दीदींनी आपल्या अलौकिक आवाजात स्वरबद्ध केलेल्या भक्ती गीतावरून मला स्फुरलेले  वरील भक्ती गीत : ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता


मूळ गीताची  लिंक :

https://geetmanjusha.com/lyrics/17806-ye-jawali-ghe-jawali-%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80

Video :
https://www.youtube.com/watch?v=duoOFxiUf8A

Thursday, 24 August 2023

कर विलिन तुझ्यात माझे प्राण


 

दत्ता अवधूता भावपुष्पे अर्पितो तव चरणी

करी कोण तुजविण नाव भक्ताची पार या भवार्णी ।।

कृपाघना राहो दृष्टीत सर्वदा दत्ता तुझेच श्री चरण

मम हृदयात चालो अविरत तुझेच नामस्मरण ।।

दिनदयाळा राहो तन मन बुद्धी सर्व तुझ्यात रममाण 

काळास ही सापडो ,कर विलिन तुझ्यात माझे प्राण ।।



🙏🌷🙏

 

गुरुवार,२४//२३१२:३० PM

अजय सरदेसाई (मेघ ) 


 

Thursday, 17 August 2023

कर्म

 


कामना कर्मबीजम्। कर्मेव वज्रं संकल्पं  तस्य पृष्ठतः शक्तिः।शरीरमनसबुद्धिसंकल्पेन  यः स्वकार्यं ईश्वरं समर्पयति सः कर्मणा प्रभावितः भवति।सः कर्मविहीनः तिष्ठति।

इच्छा हे कर्माचे  बीज आहे. कर्म हे वज्रासारखे आहे. संकल्प ही त्यामागची शक्ती आहे. जो शरीर, मन आणि बुद्धीच्या संकल्पाने आपले कर्म भगवंताला अर्पण करतो त्याच्यावर कर्माचा प्रभाव होत नाही. तो कर्मविरहित राहतो.

इच्छा कर्म का बीज है. कर्म वज्र के समान है। इसके पीछे संकल्प ही शक्ति है। जो शरीर, मन और बुद्धि से संकल्प करके अपने कर्म को ईश्वर को समर्पित कर देता है, उस पर कर्म का प्रभाव नहीं पड़ता। वह कर्म से रहित रहता है।

Desire is the seed of Karma. Karma is like a thunderbolt. Resolution is the power behind it. He who surrenders his Karma to God by resolution of body, mind and intellect is not affected by Karma. He remains devoid of Karma.


अजय सरदेसाई ( मेघ ) 

गुरुवार , दिनांक १७/०८/२०२३ , ०९:०० PM

Saturday, 12 August 2023

श्री सप्तकोटेश्वर कुल देवता


 

यदा अहं तं प्रणम्य अभिवादयामि। आशीर्वादवृष्टिभिः कमलसदृशैः नेत्रैः महता प्रीत्या स्नेहेन मां पश्यति।I १ II

 

जेव्हा  मी त्याला लिन होऊन नमस्कार करतो. आशीर्वादांचा वर्षाव करणाऱ्या त्याच्या कमळासारख्या डोळ्यांनी तो माझ्याकडे अत्यंत प्रेमाने आणि मायेने पहातो.

When I bow down to him. He looks at me with great love and affection with his lotus-like eyes showering blessings.

 

तस्य वर्णनं मम बुद्धेः वाक्यानां सामर्थ्यात् परम् अस्ति II २ II

 

मी त्याचे वर्णन करण्यास असमर्थ आहे.माझ्या बुद्धी ची आणि शब्दांची झेप तेवढी नाही.

It's beyond the power of my intellect and speech to describe him

 

सः शिवः अस्ति I मम कुल देवता श्री सप्तकोटेश्वर II ३ II

 

तो शिव आहे .माझा कुलदेव श्री सप्तकोटेश्वर

He is the pure one.My family God Shree Saptakoteshwar.

 

श्री सप्तकोटेश्वराय  विद्महे I

योगिश्वयाय धिमही I

तन्नो रुद्र: प्रचोदयात II ४ II

 

हे सप्तकोटेश्वरा आम्ही तुला जाणतो  मानतो. हे योगिश्वरा मन आणि बुद्धी ने आम्ही तुझे ध्यान करतो.हे रुद्रा तु आमच्या मन आणि बुद्धी ला प्रकाशित कर.

Om. O Lord Saptakoteshwar ,We know you and accept you. O Lord of all Yogas, we meditate on you with our mind and intellect .O Lord Rudra please enlighten our mind and intellect with knowledge.



शनिवार, दिनांक १२/८/२०२३ , ०२:१०  PM

अजय सरदेसाई ( मेघ )

Friday, 11 August 2023

निघालो घेऊन दत्ताची पालखी


 

निघालो घेऊन दत्ताची पालखी

निघालो घेऊन दत्ताची पालखी 

आम्ही भाग्यवान।आनंद निधान।

आम्ही भाग्यवान।आनंद निधान।

झुलते हळुच हृदयी दत्ताची पालखी I

झुलते हळुच हृदयी दत्ताची पालखी

निघालो घेऊन दत्ताची पालखी

 

हृदयांत ठेली मुर्ती हो दत्ताची

हृदय हो माझे पालखी दत्ताची।I I

वाहतो हृदयी फुले तव चरणी।

दरवळे सुगंध भक्तांचिया मनी I

दिप अनाहतात तेवता हा सतत

गोजिरे दत्त नाम गुंजे सहस्रसारात।I I

अंजनात हो निळ्या काषाय वस्त्र धारी

देई अभय कर हो भक्तांचा कैवारी I I

लोचनांचे अवचित झाले कॄष्णा तीर

दत्त दर्षनाने सुखे संथ वाहे निर I I

 

निघालो घेऊन दत्ताची पालखी

निघालो घेऊन दत्ताची पालखी

आम्ही भाग्यवान।आनंद निधान।

आम्ही भाग्यवान।आनंद निधान।

झुलते हळुच हृदयी दत्ताची पालखी I

झुलते हळुच हृदयी दत्ताची पालखी

निघालो घेऊन दत्ताची पालखी

 

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।

 

शुक्रवार,

दिनांक: ११/०८/२०२३

१०:५६ AM

अजय सरदेसाई (मेघ)

🙏🙏