Total Pageviews

21,644

Monday, 25 December 2023

श्री गुरुप्रार्थना


श्री गुरवे नमः

श्री श्रीपाद श्रीवल्लभाय नमः

श्री स्वामी समर्थाय नमः

मी आता जाणिले तव समर्था

तु एकची ब्रम्हाविष्णोव्योमकेशा तू श्रुष्टीकर्ता

तुज विण कोणतीच वार्ता चाले या त्रीजगी तत्त्वता

तु असे निर्गुणु आम्हांस होय तुझा अनुमानु

तु असे गुरु सर्व प्रकारु तुज नोहे असे काही नसे

मी नेणे करावी कैसी तुझी स्तुती

मी नेणे करावी कैसी तुझी भक्ती

मी जाणे इतकेच कि तू माझा कैवारी असशी  

तु अवतरला असे  मेदिनीसी केवळ जन कल्याणासी

न्यावे मज ही सुखरुप पैल पारी करुणामूर्ती  

यास्तव म्या धरिले तव श्रीपादयुग्मांबुजम दृढती

शीघ्र करी हो स्वामिया आता कृपा माजवरती

विनवीत असे तुज आता  "मेघ"  कळवळीने

 

श्री गुरुदत्तात्रेयाय नमः

 

सोमवार दिनांक २५/१२/२३ , :५० PM

अजय सरदेसाई (मेघ )


No comments:

Post a Comment