Total Pageviews

Wednesday 6 December 2023

शाश्वत- अशाश्वत


सब कुछ सिखा हमने सिखी होशियारी

सच है दुनिया वालो के हम है अनाडी

दिल का चमन उजड़ते देखा

प्यार का रंग उतरते देखा

हमने हर जीने वाले को

धन दौलत पे मरते देखा

 

खरच काय शाश्वत आहे आणि काय अशाश्वत आहे हे आपण थोरा मोठ्यां कडून ऐकतो, ग्रंथातुन वाचतो देखिल पण तरीही आपल्याला अशाश्वताची भुल का पडते ? सुंदर रुप आपल्याला लुभावतं मात्र सुंदर मना कडे आपले लक्ष ही जात नाही.

गाडी, बंगला,पैसा अडका,मान मरतब,फॉरेन टूअर्स फाइव्ह स्टार हॉटेलिंग आपल्याला सतत खुणावत असतात . आपण खूप मेहनत करून ते मिळवतो ही आणि यातच आपण अडकतो.त्यासाठी आपण काय काय नाही करत ? नीतिमत्ता ,नातीगोती ,मैत्री , सरळ मार्ग ,निखळ आनंद यावर आपण तिलांजली दिलेली असते .

जीवनाचा खरा आनंद सोडून आपण भलत्याच गोष्टीं मध्ये आनंद शोधत फिरतो .हे सगळं जवळ असे पर्यंत आपण एका खोट्या माजात ज्याला आपण आनंद समजतो त्यात डोलत असतो. हळूहळू जसं हे जायाला सुरुवात होते,(जे जाणारच असतं) की जुन्या आठवणी उगाळून आपण झुरत राहतो ,रडत बसतो.कथीकधी तर नशिबालाच नव्हे तर देवाला ही दोष देत बसतो.हे सगळं जे आपण मिळवलं , जमवलं ते सारं अनिश्चित , मर्त्य आणि अशाश्वत आहे हेच आपण विसरतो .एक दिवस ते सगळं जाणार असतंच , संपणार चअसत.

ह्या सगळ्या गोष्टी आजुबाजुला घडत असताना आपले सद्गुरू आपल्याला बजावत असतात की बाबारे हे सगळं खरं नव्हे,पाण्यावर उठणारे तरंग आहेत जे पुन्हा पाण्यातच विलीन होणार आहेत, तेव्हा यांना भुलु नकोस ! हे टिकणारं नाही, ह्यात थोडक्यात काय तो आनंद मान ,थोडी काय ती मजा ही कर ,पण हेच सर्व काही आहे असे समजून त्यात अडकू नकोस रे बाबा. तरी पण आपण सद्गुरुंच्या आवाजाकडे (अंतरात्म्याच्या ) लक्ष देतच नाही.आपलं सगळं लक्ष कृत्रिम आणि लिमीटेड आनंदावर केंद्रीत असतं.

किती हे अज्ञान असतं आपलं !!!!

हे म्हणजे अस झालं की आपल्या साठीच पंचपक्वांन्नाच्या जेवणाची थाळी बनवुन तैयार आहे ! मात्र आपल्याला हव्यास असतो तो टपरीवरच्या कळकट वडा पाव ह्याचा !! हे म्हणजे च पर्वणी , त्याहुन उत्तम काही आहे याची ना आपली धारणा असते कल्पना. आता याला अज्ञान नाही तर काय म्हणायचं मग ?

अशाश्वत हे फार फार तर या आपल्या जिवन काला पर्यंत टिकून राहील कदाचित पण, त्या पुढे ते राहणार आहे का ? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे . वाळवंटात दिसणारं मृगजळ हे ना शास्वत असतं आणि ना ते खरं असतं . तरीही लोकं त्या मृगजळा मागे पाण्याचा एखादा मोठा जलाशय सापडला म्हणून धावतातच . असे का फसतात लोकं ? त्या साठी एव्हडा जीवाचा आटापिटा का करतात ?

शाश्वत हे अनंत काळा पर्यंत ,अनंत जन्मां पर्यंत टिकून राहते.मृत्यू च्या ही पलीकडे आणि पुनर्जन्मा नंतर हीह्या आणि अश्याच शाश्वता साठी आटापिटा करायला हवा खरंतर . या जगात काय शाश्वत आहे तर ते म्हणजे गुरु शिष्यातील नातं. गुरु शिष्यातील प्रेम , दुसरे काहीच नाही .हेच काय ते शाश्वत ,अमुल्य,अक्षर आहे, बाकी सर्व अळवा वर असलेल्या पाण्या सारखे.मोत्या सारखे दिसणारे पण मोती नव्हे. लोभस पण अल्प काळ टिकणारे. खरे तर नाहीच नाही तर नुसता शुद्ध भ्रम!

प्रत्येक जन्मात आई,बाप,बंधु, भगिनी, बायको,मुलं,मित्र मंडळी, नातेवाईक हे आप-आपल्या कर्मा प्रमाणे बदलत असतात.ते आपल्या बरोबर व्यवहार करायला जन्माला आलेले असतात.

फक्त आपले सद्गुरू मात्र बदलत नाहीत ! कारण तो व्यवहार नसतोच मुळी...

ते असतं ते केवळ शुद्ध प्रेम आणि असिम भक्ती नातं ,कधीही न तुटणारं , न संपणारं , मृत्यू च्या पलीकडे ही आणि पुनर्जन्मा नंतर ही,  तसेच आभादीत आणि शाश्वत.

 

तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो.

 

मन रे तू काहे ना धीर धरे

मन रे ! तू काहे ना धीर धरे

निर्मोही मोह ना जाने जिनका मोह करे

मन रे ! तू काहे ना धीर धरे....

इस जीवन की चढ़ती ढलती धुप को किसने बाँधा

रंग पे किसने पहरे डाले रूप को किसने बाँधा

काहे ये जतन करे

मन रे ! तू काहे ना धीर धरे...

उतना ही उपकार समझ कोई जितना साथ निभा दे

जनम मरण का मेल है सपना

ये सपना बिसरा दे

कोई ना संग मरे

मन रे ! तू काहे ना धीर धरे...

मन रे ! तू काहे ना धीर धरे

निर्मोही मोह ना जाने जिनका मोह करे

मन रे ! तू काहे ना धीर धरे

 

 

          II अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त II

मंगळवार , /१२/२३ , :४५ PM

अजय सरदेसाई (मेघ )

  

🌹🩷🌹🩷🌹

No comments:

Post a Comment