Total Pageviews

Friday, 22 December 2023

तरीही मी तुला मिळवीन


  

का बा  दत्ता घेशी तू इतकी माज़ी घोर परिक्षा ?
मज नको काहीं, असे फक्त तव चरणांची कांक्षा ।
 
लक्ष लक्ष भक्त तुझे असती ज्यानां मिळते तव चरण सेवा ।
सप्त दिसांच्या पारायण सुखातुन का दिसांत दोन मज उठविले देवा ?
 
त्रिविक्रम भारती तव दांभिक म्हणता स्वयं कुमसी जाऊन विराटदर्शन दिलेस तेव्हा ।
मज कडून काय प्रमाद घडला , गुरुचरित्र- रसपान  करण्या पासुन का मज तू वंचिले देवा ।
 
जरासा मज पुण्य संचय होता धृवपद का अडचणीत आले !
माझ्या सारखे किटक या जगी कित्येक आले नी कित्येक गेले।
 
तरीही का मग ही छोटीसी मनीषा माझी तु न आणली फळा ।
का रे दिल्या फक्त हे गुरुराया तु मम हृदयी शुळ कळा ?
 
तुज भक्तांची नाही तृटी,हजार नव्हे रे लांखो करोडों असती  ।
म्हणूनच न गुरुराया तुजला असण्याची माझ्या काहीच चाड नव्हे ती ।
 
असेल जरी रे हे शतवार सत्य ची, मी हे न ऐसे होऊ देईन ।
चौर्‍याशी कोटी जरी फेरे लागले आणिक चौर्‍यासी कोटी !
पाहू किती घेतोस परीक्षा ! गुरुदत्ता स्वामिया, तरीही मी तुला मिळवीन ।

 

शुक्रवार दिनांक २२/१२/२३ , ६:०५ PM
अजय सरदेसाई (मेघ)

 

 


No comments:

Post a Comment