Total Pageviews

21,667

Saturday, 23 December 2023

सुंदर ते स्वरुप श्रीपादांचे


सुंदर ते स्वरुप श्रीपादांचे समावले माझिया डोळा

दृष्टीत तेज अवर्णनीय  करी कमंडलु रुद्राक्ष माळा

पहाताची सुंदर मुखमंडल तुझे,नेत्रज्योती ओवाळीती तुज 

करसंपुट जोडोनी वहीले मग सेवितो तव पादांभुज 

'मेघ' म्हणे सदगुरु राया तव पादद्वय दर्शने माझी झाली सोय

मिळाली मम हृदयांस शांती पहाता माझी श्रीपाद माय

 

शनिवार, दिनांक २३/१२/२३ , १२:३० PM

अजय सरदेसाई (मेघ)

 

No comments:

Post a Comment