Total Pageviews

Friday 5 April 2024

ॐ!नाद ब्रम्ह


 

काळाच्या आणि ब्रह्मांडाच्या नृत्यात,

एक नाद ,पसरला सर्वत्र आकाशांत

, विश्वाच्या हृदयाचा नाद अनाहत ,

निर्मिती आणि लय जेथे एकत्र राहतात 

 

! ज्या कंपनातून ब्रह्मांड फुलतं,

अनाहत नादात ते ढवळून निघतं

ह्याच रुद्र-तांडवातून द्वैत उमलतं

जीवांकुर रुजतो नी सर्वत्र प्रसरण होतं

 

शरीरांत अलगत श्वास-सूर गुणगुणतो

लहरींवर आत्मा शरीराशी नातं जोडतो

शरीराच्या हृदयांत ही मग तोच नाद झळकतो

..............

 

सर्वत्र , आहे ब्रह्मांडाचं गाणं,

सजीव नी निर्जीव दोघांचे ते लेणं

अक्षर , ईश्वर , प्राण ,

जे ब्रम्हांड गाते , तू ही गारे सदा गान


शुक्रवार  ०५/०४/२०२४    ०४:०९ PM 

अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment