तम मम हृदयी चे विरून जाऊ दे
तव प्रकाशे कणंकण भरून जाऊ दे
तम मम हृदयी चे विरून जाऊ दे
चैतन्य मम कणाकणांतुन झरू दे
गडद अंधारास प्रकाशाने गिळु दे
तम मम हृदयी चे विरून जाऊ दे
दिप कृपादृष्टी चे तुझ्या तेऊ दे
त्या दिपांनी आयुष्य माझे उजळू दे
तम मम हृदयी चे विरून जाऊ दे
लखलखते तारांगण त्या नभातले
हृदयांत साठवून जरासा ठेऊ दे
तम मम हृदयी चे विरून जाऊ दे
ब्रम्हांडाचे हिरण्यगर्भ ते म्या पाहिले
दिपले मनःचक्षू तसेच राहु दे
तम मम हृदयी चे विरून जाऊ दे
सतत प्रवाही तरीही निश्चल
ही अगम्य लिला तुझी कळु दे
तम मम हृदयी चे विरून जाऊ दे
मी अणु हुन अणु तरी ही अजस्त्र
हे ब्रम्हांड गुपीत हे सारे मज उमगु दे
तम मम हृदयी चे विरून जाऊ दे
हे तिमीर नाशका प्रकाशांकुरा
आपणांत न द्वैत जरा ही राहु दे
तम मम हृदयी चे विरून जाऊ दे
मंगळवार ०२/०३/२०२४ , ०९:०५ AM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment