Total Pageviews

Tuesday, 16 April 2024

गे माझी दत्त गुरु माउली


गे माझी दत्त गुरु माउली

असुदे सतत कृपेची सावली

घेता तव नाम मिळे सुख अलौकिक

प्रकाश फांकला हृदयी आंतरिक

आई येई तू नी देई मज मुख दर्शन

किती पाहु वाट दे मम प्रियदर्शन

आई येई येई तु लवकर येई

तव भेटीची आस लागली मज ठाई

कृष्णातिरी नित्य वास्तव्य तुझेची

मिटवी तृष्णा लागली जी दर्शनाची

गे माझी दत्त गुरु माउली

असुदे सतत कृपेची सावली

 

मंगळवार १६//२०२४  :२३ PM

अजय सरदेसाई (मेघ)


No comments:

Post a Comment