आळीतून पतंग निघतो करून संग्राम,
सृष्टीची ही गूढ रचना, निसर्गाचा नियम.
क्षणभंगुर जिवन त्याचे ,जिव तो क्षणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.
दोष ना कुणाचा!
वाळवंटी दिसे मृगजळ, फसतो भटकळ,
खरे नव्हे ते रे वेड्या असे मायाजाळ.
वाळवंटाचा धर्म नव्हे,हा खेळ निसर्गाचा,
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.
दोष ना कुणाचा!
कालवे हरवले काननातं व्याघ्र करी भक्ष्य,
हंबरडुन शोधे धेनु पाणावले अक्ष.
जन्म पुढील असे त्याचा पुण्य ब्राम्हणाचा,
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.
दोष ना कुणाचा!
जे जे दिसे या डोळ्यांनी ते ते सर्व मर्त्य,
फुका रडतोस गेले म्हणून,जणु जाहला अनर्थ.
येणे जाणे निश्चित बाळा,हा नियम प्रकृतीचा,
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.
दोष ना कुणाचा!
गुरुवार १९/६/२०२५ , २०:२० hrs.
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment